शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राजे मनोमिलनाची चर्चा साविआची तयारी : उदयनराजेंच्या गौरव सोहळा पत्रिकेत शिवेंद्रसिंहराजेंचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:23 IST

सातारा : ‘साताऱ्यातील दोन्ही राजेंचे पुन्हा मनोमिलन व्हावे, अशी आमची इच्छा आहे. मनोमिलनासाठी दोघांनीही पुन्हा बसावे,’ अशी आमची मागणी आहे, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांचे

सातारा : ‘साताऱ्यातील दोन्ही राजेंचे पुन्हा मनोमिलन व्हावे, अशी आमची इच्छा आहे. मनोमिलनासाठी दोघांनीही पुन्हा बसावे,’ अशी आमची मागणी आहे, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समितीचे सभापती सुनील काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांचे नाव पत्रिकेत नसल्याचे विचारल्यानंतर ‘त्यांची नावे का नाहीत?, हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे,’ असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.दरम्यान, निमंत्रण पत्रिकेत आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे नाव आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २४ फेब्रुवारी रोजी साताऱ्यात आयोजित केलेल्या सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने गुरुवारी दुपारी विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अ‍ॅड. डी. जी. बनकर, बाळासाहेब गोसावी, ईर्शाद बागवान, प्रताप शिंदे, संग्राम बर्गे, रंजना रावत, गीतांजली कदम यांच्यासह सातारा विकास आघाडीचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगराध्यक्षा कदम म्हणाल्या, ‘या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री रामदास आठवले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी उपस्थितींमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पशू-दुग्धविकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांची नावेआहेत.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेत आहे. याबाबत पत्रकारांनी ‘दोन्ही राजेंचे मनोमिलन झाले असे म्हणायचे का?’ असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला, त्यावर सुनील काटकर म्हणाले, ‘आमची तर इच्छा मनोमिलन पुन्हा व्हावे, दोन्ही राजेंनी पुन्हा बसावे, अशीच आहे.’ त्यावर एकट्या काटकरांची इच्छा आहे की सातारा विकास आघाडीच्या सर्वांचाच त्याला दुजोरा आहे?, या प्रश्नावर बोलताना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह उपस्थितांपैकी सर्वांनीच ‘आमची तशीच इच्छा आहे,’ असे एका सुरात सांगितले.

माजी खासदार व आमदारांची तसेच विविध पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचीही नावे पत्रिकेत आहेत. मात्र, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांची नावे पत्रिकेत का नाहीत?, या प्रश्नावर तर काटकरांनी ‘तुम्हाला माहितच आहे, खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने कार्यक्रम घेतला आहे, प्रोटोकॉलनुसार नावे सोहळ्यात घेतली जातील, परंतु या पत्रिकेत का घेतली गेली नाहीत, हेतुम्हीही चांगलेच जाणता,’ असे स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर थेट कासवर...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ फेब्रुवारी रोजी थेट कास पठारावर हेलिकॉप्टरमधून उतरणार आहेत. तिथून वाहनाने ते साताºयातील सोहळ्याकडे येतील. दुपारी विश्रांतीनंतर जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित सोहळ्यासाठी ते जातील, असे यावेळी सांगण्यात आले.